लातूर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पुरात 70 शेळ्या अनेक बैल वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एवढेच नव्हे तरअनेकांचे संसार उध्वस्त आले असल्याची माहिती मिळाली.
लातूर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपलं. उदगीर तालुक्यातील बोरगाव गावात रात्री पुराचे पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ग्रामस्थांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पुराच्या पाण्यात 70 शेळ्या, अनेक बैल, 5 म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकप वाहन वाहून गेले आहे. हजारो एकर शेती खरवडून गेली असून उभं पीक पाण्यात गेलं रात्री झालेल्या पावसाने लेंडी नदीला पूर आला असून धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरलं. . धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis