अमरावती : भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षपदी मिलिंद बांबल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षपदी मनमिळाऊ स्वभावाचे, जनतेसाठी आक्रमक आंदोलन करणारे, अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध कुशल संघटक मिलिंद बांबल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा भाजपा शहर जिल्हाध्य
भाजपा किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षपदी मिलिंद बांबल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती


अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षपदी मनमिळाऊ स्वभावाचे, जनतेसाठी आक्रमक आंदोलन करणारे, अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध कुशल संघटक मिलिंद बांबल यांची तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी केली. मागील ३५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले बांबल गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिकेत निवडून येत आहेत. गौरक्षण प्रभागात त्यांचा विशेष प्रभाव असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. स्थायी समिती सभापती, शिक्षण समिती सभापती म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष गाजला. महानगरपालिका शाळांमध्ये आकर्षक गणवेशाची संकल्पना, अंध विद्यार्थी व शिक्षकांना मोफत बससेवा, प्रभागातील ५३ रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गार्डन, ओपन जिम, सार्वजनिक दवाखाने, स्मशानभूमी विकास अशी अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात झाली. कोरोना काळात सुद्धा बांबल यांनी सातत्याने जनतेमध्ये राहून औषधोपचार, धान्य व आर्थिक मदत, मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबांना मदत केली. जनतेसाठी लढणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो आंदोलने केली असून शेकडो राजकीय खटल्यांना सामोरे गेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ प्रमुख अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारली. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला होता. किसान मोर्चा अध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर मिलिंद बांबल म्हणाले की, १५ दिवसांत शहरजिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. तसेच एका महिन्यात सातही मंडळ अध्यक्ष व किसान मोर्चा मंडळ कार्यकारिणी तसेच सर्व प्रभाग कार्यकारिणी जाहीर केली जाईल. अमरावती जिल्ह्यात प्रचंड जनसंपर्क असलेले, शेतकरी व नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असलेले कुशल संघटक मिलिंद बांबल यांची पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर झालेली नियुक्ती विशेष चर्चेत आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande