नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५ च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे होणार आहे. गतविजेता नीरज १६ ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये होणाऱ्या सिलेसिया डा
नीरज चोप्रा


नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५ च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे होणार आहे. गतविजेता नीरज १६ ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये होणाऱ्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेत सहभागी झाला नव्हता आणि २२ ऑगस्ट रोजी ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या पुढील डायमंड लीग टप्प्यात त्याचा सहभागाबाबतही माहिती नाही.

सिलेसिया टप्प्यानंतर जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार नीरजने डायमंड लीग अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले असल्याने तो ब्रुसेल्समध्ये सहभागी होईल की, नाही हे महत्त्वाचे नाही. नीरजने दोन डायमंड लीग सामन्यांमध्ये भाग घेतला होता आणि तो १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. एका टप्प्यात नीरज अव्वल स्थानावर होता. तर दुसऱ्या डायमंड लीग सामन्यात तो दुसऱ्या स्थानावर होता. नीरजच्या पुढे १७ गुणांसह केशॉर्न वॉलकॉट आणि १५ गुणांसह ज्युलियन वेबर आहेत. ब्रुसेल्स टप्प्यानंतर क्रमवारीमध्ये पहिल्या सहामध्ये असलेले खेळाडू झुरिचमध्ये होणाऱ्या डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

नीरजने शेवटचा ५ जुलै रोजी बेंगळुरू येथे झालेल्या नीरज चोप्रा क्लासिकमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने ८६.१८ मीटर थ्रो करून विजेतेपद पटकावले होते. नीरजसाठी हा हंगाम आतापर्यंतचा उत्तम राहिला आहे. कारण त्याने मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये ९० मीटरचा बहुप्रतिक्षित टप्पा ओलांडला होता. त्याने ९०.२३ मीटरचा कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो फेकला आणि वेबरच्या मागे दुसरे स्थान पटकावले. यानंतर जूनमध्ये पॅरिस डायमंड लीगमध्ये ८८.१६ मीटर थ्रो फेकून नीरजने पहिले स्थान मिळवले. १३ ते २१ सप्टेंबर दरम्यान टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरज आपले विजेतेपद राखणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande