प्रीमियर लीग: आर्सेनलची मँचेस्टर युनायटेडवर १-० ने मात
लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मँचेस्टर युनायटेडला १-० ने पराभूत करत आर्सेनलने प्रीमियर लीग विजेतेपदासाठीच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. सामन्यातील एकमेव गोल इटालियन डिफेंडर रिकार्डो कॅलाफिओरीने १३ व्या मिनिटाला केला. युनायटेडचा गोलकीपर अल्ताय बायि
इटालियन डिफेंडर रिकार्डो


लंडन, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मँचेस्टर युनायटेडला १-० ने पराभूत करत आर्सेनलने प्रीमियर लीग विजेतेपदासाठीच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. सामन्यातील एकमेव गोल इटालियन डिफेंडर रिकार्डो कॅलाफिओरीने १३ व्या मिनिटाला केला. युनायटेडचा गोलकीपर अल्ताय बायिंडिरच्या मोठ्या चुकीचा फायदा घेत त्याने सोप्या हेडरने चेंडू नेटमध्ये टाकला. बायिंडिर या सामन्यात जखमी आंद्रे ओनानाच्या जागी खेळला होता. युनायटेडने या हंगामात आक्रमक कमकुवतपणा दूर करण्यासाठी २०० दशलक्ष पौंड खर्च केले आहेत आणि मॅथेयस कुन्हा, ब्रायन एमबेउमो आणि बेंजामिन सेस्को यांना संघात समाविष्ट केले आहे. पण तिघेही आर्सेनलच्या मजबूत बचावफळीत प्रवेश करण्यात अपयशी ठरले आहेत. आर्सेनल गेल्या तीन हंगामात सलग दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. आणि आता प्रशिक्षक मिकेल आर्टेटा यांच्यावर २००३-०४ नंतर क्लबला पहिले लीग जेतेपद मिळवून देण्यासाठी दबाव आहे. गोलकीपर डेव्हिड राया आणि मजबूत बचावामुळे या सामन्यात संघाला विजय मिळाला. राया यांनी अनेक उत्कृष्ट बचाव केले आणि युनायटेडला बरोबरीची संधी दिली नाही. पॅट्रिक डोर्गूचा शॉट युनायटेडसाठी पोस्टवर लागला, तर एमबेउमो आणि कुन्हाचे प्रयत्नही अयशस्वी झाले. दुसरीकडे, आर्सेनलचा नवीन स्ट्रायकर व्हिक्टर ग्योकेरेस शांत दिसत होता आणि लवकरच त्याची जागा काई हॅव्हर्ट्झने घेतली. युनायटेडने दुसऱ्या हाफमध्ये दबाव आणला. पण आर्सेनलने आघाडी कायम ठेवली आणि तीन महत्त्वाचे गुण मिळवले. या विजयासह आर्सेनलने त्यांचे जेतेपदाचे प्रतिस्पर्धी लिव्हरपूल आणि मँचेस्टर सिटी यांच्याशी बरोबरी राखली आहे. ज्यांनी त्यांचे सुरुवातीचे सामने देखील जिंकले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande