रायगड, 18 ऑगस्ट (हिं.स.)।
हेटवणे मध्यम प्रकल्प कामार्ली, ता. पेण जि. रायगड. धरण सुरक्षित असून दिनांक 18.08.2025 रोजी सकाळी 11वा.28 मी धरणाचे सहा उभे दरवाजे 20 सेंटिमीटर उघडले असून धरण पाणी पातळी 85.10 मी आहे. धरणाच्या सांडव्या वरुण वहाणार्या पाण्याची खोली 20 सेंटिमीटर आहे. विसर्ग 119.54 घमी/सेकंड आहे. भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामानाचा अंदाज आणि धरणाच्या पाणलोटातील पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील पूर परिस्थिती बाबतची अद्यावत माहिती दिली जाईल.
1 प्रकल्पीय एकूण पाणीसाठा 147.49 दलघमी.
2 . प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा 144.98 दलघमी
3 . सांडवा संकल्पित संचय पातळी 83.10 मी
4.संपूर्ण जलाशय पातळी 86.10 मी 5. सध्याची पाण्याची पातळी 85.10 मी 6 . सध्याचे एकूण पाणीसाठा 141.587 दलघमी
7. सध्याचे उपयुक्त पाणीसाठा 139.077 दलघमी
8 . टक्केवारी 96 %
9 . आजचा पाऊस 69 मीमी
10 . एकूण पाऊस 2345 मीमी
11 . सांडवा विसर्ग 119.54 घमी/से.
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant Salunke