अकोला, 2 ऑगस्ट (हिं.स.)। अनेक गुन्ह्यांत सामील असलेल्या एका आरोपीला अकोला पोलिसांनी तडीपार केल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती..मात्र ही बातमी छापल्याचा राग मनात धरून संबंधित आरोपीने आपल्या साथीदारांसह वृत्तपत्राच्या संपादकावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात संपादकासह तीन जण जखमी झाले आहेत..ही धक्कादायक घटना अकोल्यात घडली असून हल्ला पूर्वमैनस्यातून झाल्याची चर्चा आहे
.आरोपींनी बेदम मारहाण केल्याने संपादक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहेय.या हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहेय..या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहेय.. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, एकाला अटक करण्यात आली आहेय..उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहेय,पोलिसांकडून तपास गतीमान करण्यात आला असून, लवकरच इतर आरोपींनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहेय..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे