अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटी यांच्या घरी चोरी
जळगाव, 5 ऑगस्ट (हिं.स.) अमळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचे एवेज पळविले यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण ३४ लाख रुपयांचा मुद्देमा
अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटी यांच्या घरी चोरी


जळगाव, 5 ऑगस्ट (हिं.स.) अमळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत लाखो रुपयांचे एवेज पळविले यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

पारोळा तालुक्यातील राजवड येथील रहिवासी असलेले अमळनेर विधानसभेचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव धोंडू पाटील हे कामानिमित्त आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते. दरम्यान मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा फायदा घेतला. घराच्या वॉल कंपाऊंड मधून प्रवेश करत घराचा मुख्य दरवाजाच्या कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला व वरच्या मजल्यावर असलेल्या दोन्हीही बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील असलेले 9 लाख रूपये किंमतीचे 8 नग सोन्याच्या मंगलपोत विविध वजनाचे एकूण वजन 300 ग्रॅम, 7 लाख रूपये किंमतीचे 16 नग सोन्याच्या बांगडया विविध वजनाचे एकुण वजन 200 ग्रॅम, 8 लाख रूपये किंमतीचे 3 नग सोन्याचे नेकलेस विविध वजनाचे एकुण वजन 200 ग्रॅम, 10 लाख रूपये रोख, 8 हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर असे एकूण 34 लाख 08 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. सदर घटना दिनांक दोन रोजी उघडकीस आली. गावातील शेजारी व त्यांचा नातू निलेश अशोक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच साहेबराव पाटलांशी संपर्क साधून माहिती कळवली. यानंतर ते नाशिकहून दुपारी दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल केले. यावेळी डी वाय एस पी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सचिन सानप व पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन हेडकॉन्स्टेबल महेश पाटील, योगेश शिंदे, आशिष गायकवाड, अभिजीत पाटील, सुनील हटकर, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पथक आदी उपस्थित होते. तसेच फॉरेन्सिक टीम, श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ हेही दाखल झाले होते. घटनेची कसून चौकशी करण्यात आली. याबाबत चोरांच्या शोधार्थ पथकही नेमण्यात आले आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या घराच्या परिसरात बसवलेल्या कॅमेराचा डीव्हीआर ही लंपास केला. परंतु ग्रामपंचायतीचे असलेल्या कॅमेरामध्ये चोरटे काही प्रमाणात दिसत असल्याचे समजले. याबाबत निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला .

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande