रत्नागिरी, 5 ऑगस्ट, (हिं. स.) : सैतवडे (ता. रत्नागिरी) येथील खाडीकिनारी गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या महिलेविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायीदा अन्वर शेखासन (वय ५८, रा. बोरसई मोहल्ला, सैतवडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याकडून ५५० रुपय किमतीची ५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू तिने सैतवडे येथील एका बंद घराच्या बाजूला खाडीच्या किनाऱ्यावर विक्रीसाठी ठेवलेली होती.
या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी