छत्रपती संभाजीनगर, 3 ऑगस्ट (हिं.स.)।खोदलेल्या जागेतील खड्ड्यात खोल पाण्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात, पार्किंगसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका खासगी भूखंडावर दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेनं परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेतील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मात्र, सदर भूखंडावर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते खोदलेल्या जागेतील खड्ड्यात खोल पाणी साचलं. दुर्दैवाने या पाण्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसून अधिक तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis