परभणी : बांबू, टोपली, सूपातून साकारली आकर्षक गणेशमूर्ती
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। जिंतूर शहरातील ‘वंदे मातरम् गणेश मित्र मंडळ’ हे शहराचे एक अनोखे आणि स्तुत्य गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. हे मंडळ फक्त जिंतूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण परभणी जिल्ह्यातील पर्यावरणपूरक उपक्रमासाठी स्तुत्य मानले जाते.
बांबू, टोपली, सूपातून साकारली आकर्षक गणेश मूर्ती जिंतूरातील ‘वंदे मातरम् गणेश मंडळाचा’ उपक्रम

परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। जिंतूर शहरातील ‘वंदे मातरम् गणेश मित्र मंडळ’ हे शहराचे एक अनोखे आणि स्तुत्य गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. हे मंडळ फक्त जिंतूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण परभणी जिल्ह्यातील पर्यावरणपूरक उपक्रमासाठी स्तुत्य मानले जाते.

गेल्या 24 वर्षांपासून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नैसर्गिक साहित्याच्या मदतीने गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी सूप, टोपली, डाल, बांबू इत्यादी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जातो. यामुळे मंडळ प्रत्येक वर्षी जिंतूर शहरासह जिल्ह्यास एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.

या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. मुंजाभाऊ रोकडे पाटील यांच्या संकल्पनेतून हे कार्य सुरू झाले आणि आजही त्यांच्या विचारधारेनुसार मंडळ कार्यरत आहे. या वर्षीचे मार्गदर्शक मंडळात दिलीपराव दुधगावकर, गंगाप्रसाद घुगे, अरविंद कटारे यांचा समावेश आहे. तसेच सल्लागार म्हणून सतीश जोरगेवार, रमेश अण्णा संगेकर, अमित राठोड, सम्राट अंभोरे, अंकुश चव्हाण आणि इतर आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने व पुढाकाराने गणेशोत्सवाचा उपक्रम राबवला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande