तेलीपुरा गणेशोत्सव मंडळातर्फे आजपासून नवसाच्या मल्हारी हळदीचे वितरण
अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या टिळक मार्गावरील तेलीपुरा चौकस्थित असलेल्या तेलीपुरा बहुउद्देशीय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवसाच्या हळदीचे (भंडारा) वितरण भाविक भक्तांना करण्यात येणार आहे. यंदा
तेलीपुरा गणेशोत्सव मंडळातर्फे आजपासून नवसाच्या मल्हारी हळदीचे वितरण


अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या टिळक मार्गावरील तेलीपुरा चौकस्थित असलेल्या तेलीपुरा बहुउद्देशीय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवसाच्या हळदीचे (भंडारा) वितरण भाविक भक्तांना करण्यात येणार आहे. यंदा मंडळाचे ८५ वे वर्ष असून यावर्षी मंडळाच्या वतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

शहरात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. यंदा संपूर्ण शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून तब्बल ६९४ मंडळ ही नोंदणीकृत आहेत. अश्यातच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा टिळक मार्गावरील तेलीपुरा चौकस्थित असलेल्या तेलीपुरा बहुउद्देशीय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जेजुरीहून आणलेली नवसाची मल्हारी हळदीचे (भंडारा) वितरण आजपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. गतवर्षी मंडळाच्या वतीने सुमारे ५००० पाकीट हळदीचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. तर यावर्षी हा आकडा आणखीन वाढणार असून भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात या नवसाच्या मल्हारी हळदीचे वितरण भाविक भक्तांना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली. यावर्षी मंडळाचे ८५ वर्ष असून त्यावर्षी आणखीन विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे.

३ सप्टेंबर रोजी अथर्वशिर्ष पठणाचे आयोजन

यंदा मंडळाचे ८५ वे वर्ष असून यावर्षी तेलीपुरा बहुउद्देशीय गणेशोत्सव मंडळ आणि मातृशक्ती धर्मजागरण समन्वय समिती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिलांसाठी अथर्वशिष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ८.३० वाजता पठणाला प्रारंभ होणार असून महिला भाविक भक्तांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण अथर्वशिष पठणाच्या कार्यक्रमाचे नियोजन मातृशक्ती धर्मजागरण समन्वय समिती, अकोला यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande