अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
दि.29/08/2025 रेाजी मौजे कंझरा रहीवाशी रेखा रमेश मते वय 40 वर्ष ही महीला कंझरा गावाजवळील नाल्यावरील रपटयावरुन जात असतांना पाय घसरुन पुराचे पाण्यामध्ये वाहुन गेली होती. त्यांचे शोधकार्य सुरु होते, सदर महिलेचा मृतदेह आज बचाव पथकास प्राप्त झाला आहे,सदर शोधकार्य दीपक सदाफळे, रणजित घोगरे, विजय मालटे यांनी शोधकार्य केले,
पातुर तालुका - दि, 30/08/25 रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील करण वानखेडे वय 24 वर्ष हा मुलगा मन नदीमध्ये वाहून गेला होता सदर मुलाचे शोधकार्य सुरू होते. आज शोधकार्या दरम्यान बचाव पथकास सदर मृतदेह घटनास्थळापासून 5 किमीवर प्राप्त झाला आहे, यासाठी सुनील कल्ले, उमेश आटोटे , मनीष मेश्राम व वंदे मातरम आपत्कालीन शोध व बचाव पथकाने प्रयत्न यशस्वी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे