अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
उत्साह, जल्लोष, आनंदाच्या उधाणात बुधवारी लाडक्या गणराचे आगमन झाले. तर आज, रविवारी पाच दिवसाच्या मुक्कामी आलेल्या गणरायाला गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया- पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात मुख्य गणेश घाट तसेच आपल्या घरातच निरोप दिला. दरम्यान निलेश देव मित्र मंडळ आणि अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने निलेश देव यांनी गणपती विसर्जनासाठी कुंड्याचे भाविकांना मोफत वितरण केले.
बहुतांश नागरिकांच्या घरी गणराज दहा दिवसासाठी विराजमान होतात. मात्र काही गणेश भक्तांच्या घरी, दिड दिवस, तीन दिवस, पाच दिवसासाठी स्थापना केली जाते. विदर्भात गणरायाची अशी स्थापना तुलनेने कमी होते. परंतु शेकडो नागरिकांच्या घरी पाच दिवसाच्या गणपतीची स्थापना केली जाते. पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्य गणेश घाटातील आठ पैकी दोन टाके पाच दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आले. तर अनेक गणेश भक्त लाडक्या बाप्पाला आपल्या घरीच निरोप देतात. ही बाब लक्षात घेवून निलेश देव मित्र मंडळ आणि अॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने गणेश भक्तांना आपल्या घरीच गणरायाला निरोप देता यावा, यासाठी माझा बाप्पा माझा घरी राहणार व मलाच जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देणारा. मी जलप्रदूषण मुक्तीसाठी सहकार्य करणार. या संकल्पनेतुन कुंड्या तसेच तुळशीच्या रोपटाचे वाटप करण्यात आले. रविवार दुपार पर्यंत १६० गणेश भक्तांना गणरायाला निरोप देण्यासाठी कुंड्या वितरीत करण्यात आल्या. तसेच ज्या नागरिकांना कडे दहाव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे,त्या भक्तांनाही गणरायाला घरीच निरोप देता यावा, यासाठी कुंड्या आणि तुळशीचे रोप दिले जाणार आहे.पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्यासाठी निलेश देव मित्र मंडळ वतीने .जयंतराव सरदेशपांडे, प्रकाश जोशी व श्शैलेश देव यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत असुन माझ्या बाप्पा माझा घरी राहणार व मलाच जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देणार मी जलप्रदूषण मुक्तीसाठी सहकार्य करणार या मोहिमेचा वाढु माती घरगुती मुर्ती असलेल्या भक्तांना समितीशी संपर्क करावा असे अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प प्रमुख श्री निलेश देव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे