परभणी : जिंतूरातील शिबीरात 925 दात्यांनी केले रक्तदान
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंम्बर यांच्या जयंती निमित्त जिंतूर शहरातील जमियत उलमा-ए-हिंदचे मौलाना तजमुल अहमद खान यांनी जामा मस्जिदच्या प्रांगणात असलेल्या मदरसा जामिया इस्लामिया दारुल उलूम मेहमूदियामध्ये आयोजित के
जमियत उलमा-ए-हिंद च्या वतीने रक्तदान आयोजन


परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंम्बर यांच्या जयंती निमित्त जिंतूर शहरातील जमियत उलमा-ए-हिंदचे मौलाना तजमुल अहमद खान यांनी जामा मस्जिदच्या प्रांगणात असलेल्या मदरसा जामिया इस्लामिया दारुल उलूम मेहमूदियामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 925 दात्यांनी रक्तदान केले.

या शिबीरात एकूण 925 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढीतील कर्मचारी, अधिकारी, हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी, नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या सर्व तरुणांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, या रक्तदान शिबिराला माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, लक्ष्मणराव बुधवंत, प्रदीप चव्हाण, नानासाहेब राऊत, परभणी रक्तपेढीच्या राठोड, जिंतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे, मौलाना जलील, मुफ्ती मिर्झा कलीम बेग, परभणीचे सय्यद अ. कादर व त्यांचे सहकारी, शहरातील माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी भेटी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande