परभणी : बाल विद्यामंदिर प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बाल विद्यामंदिर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यव
बाल विद्यामंदिर प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा


परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बाल विद्यामंदिर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक बळीराम कोपरटकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून समुपदेशक पी. एम. सोनोने उपस्थित होते. या प्रसंगी क्रीडा शिक्षक संतोष देशमुख यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. कु. श्रावणी मुरमुरे, कु. वैदेही शेटे व कु. प्रतीक्षा काळे या विद्यार्थिनींनी तयार केलेले भित्तीपत्रक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.

मार्गदर्शक पी. एम. सोनोने यांनी आपल्या भाषणातून खेळाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम सांगत विद्यार्थ्यांना नियमित खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर बळीराम कोपरटकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन करत मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी जीवनपटाचा आढावा घेतला.

आपल्या अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव केला व क्रीडामनस्क वृत्ती अंगीकारण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९वी (क) चे विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक संदीप जाधव यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande