परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय अन्वये अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी सुधारीत धोरण तयार करण्यात आले आहे. या शासन निर्णया नुसार या पुढे गट-क संवर्गाची सुधारित अनुकंपा नियुक्ती प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर ठेवण्यांची तरतुद केली केली असुन इतरही तरतुदी केल्या आहेत. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदी नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिपत्रक सुधारित अनुकंपा यादी व गट-क संवर्गातील रिक्त पदाचा तपशिल जिल्ह्याचे संकेतस्थळ www.parbhani.nic.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी मुख्यंमत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सामाईक एकत्रित अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा मेळावा दि.02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी सदर दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis