हरिहर किल्ल्यावरून पडून पर्यटकांचा मृत्यू
इगतपुरी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। - जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंग साठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे. याब
हरिहर किल्ल्यावरून पडून पर्यटकांचा मृत्यू


इगतपुरी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

- जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंग साठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष टीकाराम समरीत (वय २९, रा. खमारी, जि. भंडारा) हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी आला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले होते. परत आज शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ते हरिहर किल्ला येथे ट्रेकिंगसाठी आले होते.

यावेळी उतरत असताना सुमारे म१२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो साधारण शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर वनविभाग व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande