लातूरमधील विजयकुमारच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार, अहमदपूर तहसीलदारांना निवेदन
लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.) अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील विजयकुमार घोगरे यांच्या मृत्यूला प्रशासन कारणीभूत आहे, म्हणून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांना आज देण्यात आले . विजय कुमार हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत
अहमदपूर


लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)

अहमदपूर तालुक्यातील

टाकळगाव येथील विजयकुमार घोगरे यांच्या मृत्यूला प्रशासन कारणीभूत आहे, म्हणून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांना आज देण्यात आले .

विजय कुमार हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गेले असतां त्यांचे तेथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते, परंतु विजयकुमार घोगरे यांचा मृत्यू हा मुंबई येथील आंदोलनात प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात आली नसल्याचे सिद्ध झाले आहे

असा आरोप माजी आमदार विनायकराव पाटील यांनी केला आहे.

विजयकुमार यांच्या मृत्यूला प्रशासन कारणीभूत आहे, म्हणून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांना देण्यात आले,

अहमदपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतिने आयोजित शोकसभेस उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande