डोपिंग प्रकरणी धावपटू परवेझ खानवर ६ वर्षांच्या बंदीची कारवाई
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर (हिं.स.)मध्यम अंतराचा धावपटू परवेझ खानवर डोपिंगमध्ये अडकल्याबद्दल आणि १२ महिन्यांत तीन डोप चाचण्या चुकवल्याबद्दल भारतीय धावपटू परवेझ खानवर ६ वर्षांच्या बंदी घालण्यात येणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकन कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक्समध्ये चम
धावपटू परवेझ खानवर डोपिंगप्रकरणी ६ वर्षांची बंदी


नवी दिल्ली, 3 सप्टेंबर (हिं.स.)मध्यम अंतराचा धावपटू परवेझ खानवर डोपिंगमध्ये अडकल्याबद्दल आणि १२ महिन्यांत तीन डोप चाचण्या चुकवल्याबद्दल भारतीय धावपटू परवेझ खानवर ६ वर्षांच्या बंदी घालण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी अमेरिकन कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक्समध्ये चमकदार कामगिरी करून परवेझने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यानंतर लगेचच पंचकुला येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्या नमुन्यात एरिथ्रोपोएटिन (ईपीओ) हे प्रतिबंधित औषध आढळले. त्यानंतर त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.

ईपीओ म्हणजे काय?

ईपीओ हे एक औषध आहे जे लाल रक्तपेशी वाढवते आणि खेळाडूंचा स्टॅमिना वाढवण्यासाठी डोपिंगमध्ये वापरले जाते. वैद्यकीय क्षेत्रात ते कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

परवेझने नमुना बी चाचणी घेतली नाही आणि नमुना ए चा अहवाल स्वीकारला. सामान्यतः या गुन्ह्यासाठी ४ वर्षांची बंदी घातली जाते. पण याशिवाय त्याने १२ मे, १० जुलै आणि ५ डिसेंबर २०२३ रोजी तीन डोप चाचण्या देखील चुकवल्या, ज्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येते.

राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (NADA) च्या अँटी-डोपिंग शिस्तपालन पॅनेल (ADDP) ने ६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, खेळाडूचा नमुना EPO पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच, त्याने १२ महिन्यांच्या कालावधीत आणखी एक अँटी-डोपिंग नियमाचे उल्लंघन केले आहे. म्हणून, दोन्ही उल्लंघनांची शिक्षा एकत्रित केली आहे आणि बंदीचा कालावधी ६ वर्षांचा निश्चित केला आहे. ही बंदी २८ ऑगस्ट २०२४ पासून लागू मानली जाईल. त्याला तात्पुरते निलंबन देण्यात आले होते. या दरम्यान, २७ जून २०२४ नंतरचे त्याचे सर्व स्पर्धात्मक निकाल रद्द केले जातील आणि जिंकलेले पदके, गुण आणि बक्षिसे परत घ्यावी लागतील.

इतर खेळाडूंवरही कारवाई

एडीडीपीच्या ताज्या यादीत, इतर खेळाडूंनाही डोपिंगमुळे बंदी घालण्यात आली आहे, ज्यात सुमी (क्वार्टरमायलर, हरियाणा) - २ वर्षांची बंदी (१४ ऑक्टोबर २०२४ पासून), रेश्मा दत्ता केवटे - ४ वर्षांची बंदी, श्रीराग ए.एस. - ५ वर्षांची बंदी, अनिरुद्ध अरविंद (रेसिंग कार ड्रायव्हर, चेन्नई) - ३ महिने बंदी (२२ ऑगस्टपासून), रोहित चमोली (बॉक्सर, आशियाई ज्युनियर सुवर्णपदक विजेता २०२१) - २ वर्षांची बंदी (२३ ऑगस्टपासून), दीपक सिंग (वेटलिफ्टिंग) - ४ वर्षांची बंदी (२५ सप्टेंबर २०२४ पासून), सिमरनजीत कौर (वेटलिफ्टिंग) - ५ वर्षांची बंदी (२२ ऑगस्टपासून), अर्जुन (कुस्ती) - ४ वर्षांची बंदी (११ जून २०२४ पासून), मोहित नांदल (कबड्डी) - ४ वर्षांची बंदी (१४ ऑगस्टपासून) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande