छ.संभाजीनगर - ३ ते ५ फेब्रुवारी या काळात पदार्थ विज्ञान विभागाची आंतरराष्ट्रीय परिषद
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने ’इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान-त
देश-विदेशातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार


छत्रपती संभाजीनगर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने ’इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान-तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ यांच्या गौरवार्थ सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिषद होणार असून संशोधकांकडून शोधनिबंध मागविण्यात आले आहेत. ३ ते ५ फेब्रुवारी या काळात ही आयसीएमएस-२०२६ परिषद विद्यापीठाच्या नाटयगृहात संपन्न होईल. या परिषदेत देश-विदेशातील ५० हून अधिक नामांकित पदार्थविज्ञान तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा.मेंगलिन टीसाई (तैवाण), प्रा.अशोक मुलचंदानी (अमेरिका), प्रा.टिबोर हिमानिक (स्मोव्हाकिया), प्रा.डाँग हा किम, डॉ.डेनिसन सवॅरिराज (दक्षिण कोरिया), प्रा.मायकल पियासेकी (पोलांड), प्रा.एम.आय.सय्यद (जॉर्डन), प्रा.ए.के.प्रसन्न (तैवान विद्यापीठ), प्रा.री.इची मुराकामी (जपान), प्रा.अजयान विणु (ऑस्ट्रेलिया), प्रा.मोहम्मद चेहिमी (प्रâाँस), प्रा.याटीग नी (चीन), प्रा.इलियास स्टॅरोस (ग्रीस), प्रा.जाँग रेन हुआंग (तैवाण), प्रा.एम.एस.बडावी (इजिप्त) व डॉ.गजानन बोडरवे (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. तसेच कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी (पुणे), डॉ.डी.के.असवाल (बार्क) यांच्या देशातील विषयतज्ज्ञ विविध सत्रात सहभागी होणार आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी अध्यक्ष डॉ.प्रवीणा पवार, तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ.एम.डी.शिरसाठ, समन्वयक डॉ.बी.एन.डोळे व सचिव डॉ.प्रभाकर उंदरे आदीसह संयोजन समिती सदस्य प्रयत्नशील आहेत. २५ उपविषय असून तीन दिवस मंथन होणार आहे. देश-विदेशातील संशोधकांनी परिषदेसाठी शोध निबंध पाठवावेत, असे आवाहनही संयोजन समितीने केले आहे.

पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ हे साडेतीन दशकाच्या सेवेनंतर येत्या फेब्रुवारीत सेवानिवृत्त होत आहेत. पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख, डीडीयुकेके संचालक, अकॅडमिक स्टाफ कॉलेज संचालक, कुलसचिव आदी पदांवर त्यांनी कार्य केले आहे. तसेच ३२० शोधनिबंध संशोधन परिषदेत प्रकाशित झाले आहे. सोबत ३१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी प्राप्त केली आहे. त्यांच्या कारिकिर्दीचा गौरव म्हणून एका महत्वपूर्ण विषयावर तीन दिवस मंथन होणार आहे. विभागाच्यावतीने या महत्वपूर्ण विषयावर सदर परिषद होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande