निरोगी हृदयासाठी व्यायामाबरोबर वेळोवेळी तपासणी गरजेची - डॉ. हेमंत आहिरे
नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)। हृदयाशी निगडीत विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराशी संबंधीत आधुनिक उपचार अवगत झाले असले, तरी हृदयविकार होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. निदान झाल्यास योग्य ठिकाणी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली
निरोगी हृदयासाठी व्यायामाबरोबर वेळोवेळी तपासणी गरजेची : डॉ.  आहिरे


नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)। हृदयाशी निगडीत विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयविकाराशी संबंधीत आधुनिक उपचार अवगत झाले असले, तरी हृदयविकार होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. निदान झाल्यास योग्य ठिकाणी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे गरजेचे असते. निरोगी हृदयासाठी व्यायामाबरोबर वेळोवेळी तपासणीही तितकीच गरजेची असल्याचे प्रतिपादन उपेंद्र नगर येथील अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. हेमंत (राज) आहिरे यांनी केले. मॉर्निंग ग्रुप परिवाराकडून मॉर्निंग टिप्स कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. हेमंत आहिरे बोलत होते.

डॉ. हेमंत आहिरे म्हणाले की, हृदयविकार टाळायचा असेल तर सकाळी लवकर उठून व्यायामातून दिवस सुरु करावा. पौष्टीक आहार व पुरेशी झोप घेणे महत्वाचे असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे बहुतांश वेळा आजार जडतात. पण हृदयविकाराचे निदान झाल्यास शास्त्रोक्त पध्दतीने उपचार घेणे महत्वाचे ठरते. हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी तज्ञांकडून तपासण्या करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande