नांदेड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली व सुजित गुंजे, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या देखरेखीखाली स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत नांदेड शहरातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आली
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण → 3 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई, 3 वाहने जप्त (बिना हेल्मेट / बेकायदेशीर पार्किंग)पोलीस स्टेशन भाग्यनगर → 3 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई, 2 वाहने जप्त करण्यात आली
पोलीस स्टेशन फरीदगंज → 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई पोलीस स्टेशन शिवाजीनगर → 1 मद्यधुंद व्यक्तीवर कारवाई, 2 वाहने जप्त केली.पोलीस स्टेशन नेहरूनगर → 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई
पोलीस स्टेशन महादेववाडी → 1 मद्यधुंद व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर आळा घालणे, नागरिकांसाठी सुरक्षित व निश्चिंत वातावरण निर्माण करणे
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे यासाठी पोलीस तत्पर आहेत.
काही अनुचित प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा किंवा हेल्पलाईन 112 वर संपर्क साधावा. असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis