अमरावती : विष्णोरामधील जीर्ण पाण्याची टाकी बनली धोकादायक
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा अमरावती, 1 सप्टेंबर (हिं.स.) | मोर्शी तालुक्यातील विष्णोरा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक तीनमध्ये असलेली जुनी आणि जीर्ण पाण्याची टाकी सध्या धोकादायक स्थितीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांम
विष्णोरामधील जीर्ण जलटाकी बनली मृत्यूचा सापळा! ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर उठणार?


ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा

अमरावती, 1 सप्टेंबर (हिं.स.) | मोर्शी तालुक्यातील विष्णोरा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक तीनमध्ये असलेली जुनी आणि जीर्ण पाण्याची

टाकी सध्या धोकादायक स्थितीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या टाकीचे तुकडे खाली कोसळत असून, या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीवित धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही, त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

या टाकीचा काही भाग आधीच ढासळलेला असून, त्याचे अवशेष खाली पडताना अनेक वेळा दिसले आहेत. भविष्यात टाकी पूर्णपणे कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि महिला वर्ग याच मार्गाने ये-जा करत असल्याने धोका अधिक गहिरा बनतो आहे.स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा धोका निर्माण झाला असून, जबाबदारी स्वीकारून तत्काळ उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande