अमरावती, 1 सप्टेंबर (हिं.स.) : गवताची जंगलं, साचलेलं पाणी आणि सरपटणारे प्राणी; जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ , विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या आजूबाजूला माणूसभर गवत उगवले असून, त्यात साचलेलं पाणी हे जणू रोगराई व सर्पप्राण्यांचं खुलं आमंत्रणच बनलं आहे. या गवतामध्ये सरपटणारे प्राणी, विषारी साप आणि डासांचा उपद्रव वाढला असून, विद्यार्थ्यांना शाळेत येताना जीव मुठीत धरावा लागत आहे. काही शिक्षकांनी गुप्तपणे सांगितले की, या भागात साप दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत ही परिस्थिती अधिक गंभीर बनते आहे. शाळेच्या आजूबाजूचं गवत कापलं जात नाही, पाणी साचतं, दुर्गंधी पसरते, आणि ग्रामपंचायत याकडे पाहतच नाही. हे तर लहान मुलांचं शिक्षणाचं ठिकाण आहे की रुग्णालयात पाठवायचं केंद्र? तात्काळ गवत हटवून परिसराची स्वच्छता करावी साचलेल्या पाण्याचा निचरा करावा डास, साप इ. प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात शाळेच्या सभोवताल स्वच्छतेसाठी विशेष निधी व मनुष्यबळ द्यावे प्रशासकीय बेफिकिरीमुळे गावातील शाळा जणू अपघाताची वाट पाहत आहे. लहानग्यांच्या जिवाशी प्रशासनाने किती वेळा खेळ मांडायचा ? ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी