लातूर - भटके विमुक्त दिन आ.रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत साजरा
लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय भटके विमुक्त दिन आ.रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत आज साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केल
राष्ट्रीय भटके विमुक्त दिन आ.रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत साजरा...!


लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

राष्ट्रीय भटके विमुक्त दिन आ.रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत आज साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते त्यानुसार लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात राष्ट्रीय विमुक्त घुमंतू तथा अर्ध घुमंतू जनजाती परिषदेच्या वतीने भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय विमुक्त आघाडीचे राजेंद्र वनारसे, दिलीप धोत्रे, शिवसिंह सिसोदिया, पृथ्वीसिंह बायस, भागवत सोट, धनराज माने, रामपाल भंडे, गगनसिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बहुसंख्य भटके विमुक्त आवर्जून उपस्थित होते. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी अनेक योजना जाहीर करून दिलासा दिला असल्याचे अनेकांनी यावेळी बोलून दाखविले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande