अकोला, 5 ऑगस्ट (हिं.स.)।
पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत बापलेकांचा मृत्यू... पिंजर फाट्याजवळ घडला भीषण अपघात... अपघातानंतर परिसरात हळहळ... पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अकोला - मंगरुळपीर रोडवरील पिंजर फाट्याजवळ आज दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात अकोला तालुक्यातील लाखणवाडा येथील व समता नगरमध्ये राहणारे वडील आणि मुलगा – उमेश रमेश शिरसाट वय ३२ आणि रमेश हरिभाऊ शिरसाट वय ६० – यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे