शेतकऱ्यांच्या घरांना आग, मोठं नुकसान
अकोला, 5 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील खेकडी येथील दोन शेतकऱ्यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडलीय..मात्र अग्निशमनची गाडी बंद पडली आणि गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. Lअकोला जिल्ह्यातील खेकडी गावात दोन शेतकऱ्यांच्या घरांना अचानक आग लागल्य
P


अकोला, 5 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला जिल्ह्यातील खेकडी येथील दोन शेतकऱ्यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडलीय..मात्र अग्निशमनची गाडी बंद पडली आणि गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.

Lअकोला जिल्ह्यातील खेकडी गावात दोन शेतकऱ्यांच्या घरांना अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहेय..या आगीत शेतकरी चक्रभुज काकड, उमेश काकड, सुरेश मोरे आणि विपुल मोरे यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झालेय..या आगीत कुटार, स्प्रिंकलर पाईप, थ्रेशर मशीन, झटका मशीन, भजनाचे साहित्य तसेच पाणीसाठवणीचे सिंटेक्स बॅरल यांचे मोठे नुकसान झाले आहेत.. आग इतकी भीषण होती की काही वेळातच सर्व साहित्य भस्मसात झाले.

आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला फोन केला. मात्र, फायर ब्रिगेडची गाडी गावाजवळील अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरच बंद पडली, त्यामुळे वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.अखेर गावकऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande