इस्लामाबाद, 1 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये सोमवारी (१ सप्टेंबर) मोठा अपघात झाला आहे. माहितीनुसार, गिलगित-बाल्टिस्तानमधील चिलास येथे एक हेलिकॉप्टर कोसळून अपघात घडला आहे.या दुर्घटनेत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, हे सेनेचे एमआय-17 हेलिकॉप्टर होते. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रॅश झाल्यानंतर त्वरित हेलिकॉप्टरला आग लागली आणि आकाशात धुराचा मोठा लोळ उठला.
मीडिया रिपोर्टनुसार, हा अपघात चिलासमधील डायमर जिल्ह्यात झाला आहे. एमआय-17 हेलिकॉप्टर एका नवीन हेलीपॅडवर टेस्ट लँडिंग करत होते, तेव्हाच ते क्रॅश झाले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये २ पायलट आणि ३ टेक्निशियन होते. घटनेनंतर त्वरित पोलिस आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, या दुर्घटनेबाबत अधिकृत निवेदन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
पाकिस्तानमध्ये याआधीही अनेक वेळा हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत आणि अशा दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. याच वर्षी १५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये अजून एक एमआय -17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहमंद जिल्ह्यात हे हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले होते. मात्र, खराब हवामानामुळे ते कोसळले. या दुर्घटनेतही ५ लोकांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये २ पायलट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode