टॅरिफ हटवले तर अमेरिका नष्ट होईल, लष्करी शक्ती नष्ट होईल - ट्रम्प
वॉशिंग्टन, 1 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या संघीय अपील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की ट्रम्प प्रशासनाने लावलेले बहुतेक टॅरिफ कायद्यानुसार योग्य नाहीत. या निर्णयावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अत्यंत स
ट्रम्प


वॉशिंग्टन, 1 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या संघीय अपील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की ट्रम्प प्रशासनाने लावलेले बहुतेक टॅरिफ कायद्यानुसार योग्य नाहीत. या निर्णयावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची टीका करत असेही चेतावले की, जर टॅरिफ हटवले गेले, तर अमेरिका पूर्णपणे नष्ट होईल आणि तिची सैन्यशक्ती लगेचच संपुष्टात येईल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयावर भाष्य करत न्यायाधीशांना ‘कट्टरपंथी डाव्या विचारसरणीचे गट’ असे संबोधले. त्यांनी लिहिले, “टॅरिफशिवाय आणि आपण आधीच गोळा केलेल्या अब्जावधी डॉलर्सशिवाय, आपला देश पूर्णपणे नष्ट झाला असता आणि आपली सैन्यशक्ती लगेच संपली असती. या कट्टर डाव्या न्यायाधीशांच्या गटाला याची काहीही पर्वा नव्हती. मात्र, ओबामा यांनी नियुक्त केलेल्या एका डेमोक्रॅट न्यायाधीशाने प्रत्यक्षात आपला देश वाचवण्यासाठी मत दिले. त्यांच्या धैर्यासाठी मी त्यांचे आभार मानतो! ते अमेरिकेवर प्रेम करतात आणि तिचा आदर करतात.”

ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की ते या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी लिहिले, “जर हा निर्णय याप्रमाणेच राहिला, तर तो खरोखरच अमेरिकेचा विनाश करेल.”

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते म्हणाले, “ट्रम्प यांनी सर्वकाही कायदेशीर मार्गाने केले आहे आणि आम्हाला या प्रकरणात अंतिमतः यश मिळेल, अशी आशा आहे.”

अमेरिकेच्या संघीय न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास सर्व देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा कायदेशीर अधिकार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, ट्रम्प यांना राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करून सर्व देशांवर टॅरिफ लावण्याचा कायदेशीर अधिकार नाही.तरीसुद्धा, न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लावलेले टॅरिफ तत्काळ रद्द केलेले नाहीत.ट्रम्प प्रशासनाला सुप्रीम कोर्टात अपील करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अमेरिकेतील टॅरिफ धोरणावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि ट्रम्प यांच्या पुढील राजकीय रणनीतीवरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande