पंतप्रधान मोदींनी चीन दौऱ्यात विशेष कारने केला प्रवास
बीजिंग , 1 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत एका खास पद्धतीने करण्यात आले. चीनच्या सरकारने त्यांच्या प्रवासासाठी “होंगकी एल ५ ” ही एक विशेष लक्झरी लिमोझीन पाठवली होती. ही कार काही साधी-सुधी नाही,
विशेष कारने


बीजिंग , 1 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वागत एका खास पद्धतीने करण्यात आले. चीनच्या सरकारने त्यांच्या प्रवासासाठी “होंगकी एल ५ ” ही एक विशेष लक्झरी लिमोझीन पाठवली होती. ही कार काही साधी-सुधी नाही, कारण ह्याच मॉडेलचा वापर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा त्यांच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये करतात.

होंगकी ही चीनसाठी केवळ एक कार नाही, तर राष्ट्रीय अभिमान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानली जाते. या कारची लांबी सुमारे 18 फूट असून वजन 3.1 टन आहे. तिची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे.होंगकी हा चीनमधील सर्वात जुना लक्झरी कार ब्रँड आहे, ज्याची सुरुवात 1958 मध्ये झाली होती. ही कार एफएडब्ल्यू ग्रुपद्वारे बनवली जाते.

या कारला चीनमध्ये “रेड फ्लॅग” म्हणूनही ओळखले जाते. 2019 मध्ये जेव्हा शी जिनपिंग भारत भेटीस आले होते, तेव्हाही त्यांनी हीच कार वापरली होती. तज्ज्ञांच्या मते, ही गाडी चिनी राष्ट्राध्यक्षांसाठी खूप महत्त्वाची आहे. आता ह्याच कारमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या चीन दौऱ्यात प्रवास केला.

जेव्हा पंतप्रधान मोदी होंगकीएल ५ मध्ये बसले, तेव्हा हा एक राजनैतिक संदेश होता. हा सन्मान फक्त विशेष पाहुण्यांनाच दिला जातो आणि यामधून चीनचा राष्ट्रीय ओळख व लक्झरी उत्पादनांवरील अभिमान दिसतो.

पूर्वी चीन पाश्चिमात्य देशांच्याए लक्झरी कार्सवर अवलंबून होता, पण आता तो स्वतःच्या बनवलेल्या लक्झरी गाड्यांद्वारे जगाला प्रभावित करू इच्छितो.होंगकीला चीन तशीच ओळख देत आहे, जशी अमेरिकेच्या Cadillac किंवा ब्रिटनच्या Rolls-Royce ला आहे. ही कार चीनच्या “मेड इन चायना” स्वप्नाचा भाग आहे. जे हे सिद्ध करतं की चीन केवळ स्वस्त वस्तू बनवणारा देश नाही, तर लक्झरी आणि हाय-टेक उत्पादनं तयार करण्यातही सक्षम आहे.

1960 च्या दशकात माओ झेडोंग यांच्या परेड कारपासून ते आज शी जिनपिंग यांच्या अधिकृत गाडीपर्यंत,होंगकी नेहमीच चीनची ताकद आणि आत्मविश्वास यांचे प्रतिनिधित्व करत आली आहे. आज होंगकी केवळ एक कार नसून, ती चीनच्या नवप्रवर्तन आणि लक्झरी क्षमतेचा पुरावा आहे आणि हे दर्शवते की या क्षेत्रातही चीन जगातील महासत्तांमध्ये स्थान मिळवण्यास सक्षम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande