रत्नागिरी : कला महोत्सवात ऋग्वेद रेमणे, श्रीरंग जोगळेकर प्रथम
रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनातफे आयोजित कला महोत्सवात कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथील युवा तबला वादक ऋग्वेद रेमणे आणि रत्नागिरी येथील संवादिनी वादक श्रीरंग जोगळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. विभाग स्तरावर रत्नागिरीत झालेल्य
ऋग्वेद रेमणे, श्रीरंग जोगळेकर


रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनातफे आयोजित कला महोत्सवात कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथील युवा तबला वादक ऋग्वेद रेमणे आणि रत्नागिरी येथील संवादिनी वादक श्रीरंग जोगळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विभाग स्तरावर रत्नागिरीत झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग आशा पाच जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

मूळ कोंडगाव येथील आणि रत्नागिरीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋग्वेद केदार रेमणे याने एकल तालवाद्य या प्रकारात तबला वादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्याला कोल्हापूर येथील तबलावादक गिरीधर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

एकल स्वरवाद्य या प्रकारात रत्नागिरी येथील श्रीरंग हेरंब जोगळेकर याने संवादिनी वादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्याला रत्नागिरीतील हार्मोनियम वादक केदार लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभले.

ऋग्वेद आणि श्रीरंग या दोघांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. त्या दोघांचेही प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य गोसावी, पर्यवेक्षक केळकर तसेच अन्य प्राध्यापकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande