रत्नागिरी : प्रा. संगीता जोशी लिखित “सन्माननीय व्यासपीठ” पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : गद्रे जुनिअर कॉलेजमधील मराठीच्या प्राध्यापिका प्रा. सौ. संगीता प्रमोद जोशी यांच्या “सन्माननीय व्यासपीठ” या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १४ सप्टेंबर) चिपळूण येथे होणार आहे. हा समारंभ ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभा
रत्नागिरी : प्रा. संगीता जोशी लिखित “सन्माननीय व्यासपीठ” पुस्तकाचे रविवारी प्रकाशन


रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : गद्रे जुनिअर कॉलेजमधील मराठीच्या प्राध्यापिका प्रा. सौ. संगीता प्रमोद जोशी यांच्या “सन्माननीय व्यासपीठ” या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १४ सप्टेंबर) चिपळूण येथे होणार आहे.

हा समारंभ ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार असून, सुप्रसिद्ध वक्ते राजीव बर्वे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. सोहळ्याच्या मुख्य अतिथी म्हणून अभिनेत्री, लेखिका व निवेदिका सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. हा प्रकाशन सोहळा परशुराम एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.

प्रा. संगीता जोशी यांनी आपल्या अध्यापनाबरोबरच दैनिक सागरमध्ये मुद्रितशोधक म्हणून काम केले आहे. वक्तृत्व स्पर्धांमधून त्यांनी यश मिळवले असून त्यांच्या दोन्ही मुलींनी अनेक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांस्कृतिक, कला व साहित्य क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या संगीता जोशी यांचे हे पहिले पुस्तक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande