लातूर, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केलेल्या लातूर जिल्ह्यातील भरत कराड यांच्या कुटुंबियांसोबत बाळासाहेब आंबेडकर यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून कुटुंबियांचे सांत्वन केले.
राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाचं काय? अशी चिंता व्यक्त करत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय ओबीसी बांधवाने नदीत उडी मारून आत्महत्या केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कुटुंबियांसोबत बाळासाहेब आंबेडकर यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना सांत्वन केले.
वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे, रोहित सोमवंशी, रेणापूर तालुकाध्यक्ष आर. के. आचार्य, डॉ. अजनिकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले व वंचित बहुजन आघाडी या दुःखात कुटुंबियांच्या सोबत असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis