अजित पवारांनी ऐकल्या तब्बल ४ हजार तक्रारी; जनसंवाद अभियानाची सुरूवात
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शासकीय यंत्रणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स
ajit pawar


पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शासकीय यंत्रणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहोचल्या.

तक्रार नोंदणी, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचविणे, विभागीय समन्वयातून तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा ‘जनसंवाद’मध्ये राबविण्यात आली आहे. नागरी सेवांतील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, स्थानिक आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande