अकोला : बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसाची पोलिस कोठडी!
अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.) : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौहिद खान समीर खान (वय २८) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली
प


अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.) : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौहिद खान समीर खान (वय २८) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली होती. मुलीचे नातेवाईक बाहेर असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला आणि फरार झाला. १२ सप्टेंबरला इंदूर (मध्य प्रदेश) येथे लपलेला असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली.

अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सहा दिवसांनंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदोर मधून अटक केली आहे. तौहिद समीर असं नराधम आरोपीचे नाव असून या आरोपीने मुलीच्या घरचे गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होताय. दरम्यान या प्रकरनानंतर अकोल्यात संतापाची भावना पसरली होती. विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली, दुसरीकडे 'सकल हिंदू समाज' आक्रमक झाला. अकोल्यात मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने 'हिंदू जन आक्रोश' मोर्चा काढण्यात आला. तर ६ दिवसांनंतर नराधम तौ खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे.

सहा दिवसांच्या फरारीदरम्यान आरोपीने पाच राज्यांत दहा जिल्ह्यांमधून स्थलांतर केलं. या कालावधीत त्याला कोण मदत करत होतं? आर्थिक मदत कुणाकडून मिळाली? तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास पोलिस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande