अकोला, 13 सप्टेंबर (हिं.स.) :अकोल्यात शेयर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी आर्थिक फसवणूक (२०,२२,२९०/- रूपये) गुन्हयामधील आरोपीला संभाजीनगर, महाराष्ट्र येथून ताब्यात घेण्यात आले.
दिनांक ०४/०६/२०२४ रोजी फिर्यादी नामे योगेश अर्जुन जवंजाळ, वय ३२, रा. विठ्ठल नगर चौक, मोठी उमरी, अकोला यांनी पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे तक्रार दिली की, त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले, त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचे सांगण्याप्रमाणे एकूण २०,२२,२९०/- रूपये रकमेची गुंतवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले वरून त्यांनी पो. स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. १९५/२०२५ कलम ३१६ (२), ३१८(४), ३ (५) भा.एन.एस. सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर तपास. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोस्टे सिव्हील लाईन येथुन पोउपनि. संदिप बलोद, यशवंत जायभाये व पोस्टे सायबरचे पोहवा. प्रशांत केदारे, अतुल अजने व तेजस देशमुख आरोपी अटक कामी संभाजीनगर, महाराष्ट्र येथे रवाना झाले. आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे अल्ताफ अली उर्फ युनुस अली सय्यद, वय ४९, रा. धनगर गल्ली, फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर याला स्थानिक पोलीस यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असुन प्रथम वर्ग न्यायालय, अकोला येथे हजर केले असता १५/०९/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे