धुळ्यात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
धुळे, 13 सप्टेंबर (हिं.स.) धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा वतीने पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस
धुळ्यात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात


धुळे, 13 सप्टेंबर (हिं.स.) धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्हा वतीने पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेटी बचाव बेटी पढावच्या अध्यक्षा सौ. अल्पाताई अग्रवाल होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अजय भदाणे सर, प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, सौ. मायाताई परदेशी, सुमनकाकू महाले, विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी आदी होत्या.

यावेळी अल्पाताई अग्रवाल म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले तर महिला मंडळ मा. जिल्हा अध्यक्षा सौ. सुमन काकू महाले यांनी प्रांतिक महिला आघाडीचे वर्षभर स्तुत्य कार्यक्रम घेत असतात तर मुलांच्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. रस्ता सुरक्षा पथकाचे समादेशक अजय भदाणे सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. भाजपा ओबीसी महिला आघाडी उपाध्यक्षा सौ. माया ताई परदेशी यांनी गुणी विद्यार्थी कौतुक करताना सांगितले की, आपल्या यशामुळे कुटुंबासोबत समाज व देशाचे नाव मोठे होत असते तर प्रांतिक तैलिक महिला आघाडीला सहकार्य करण्याचे सुचविले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande