मॉस्को, 13 सप्टेंबर (हिं.स.)रशियाच्या कामचटका प्रदेशात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जर त्सुनामी आली तर ती तेथे विनाश घडवू शकते. अशा परिस्थितीत कामचटका किनाऱ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, 'रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.' पण, जपानमध्ये ७ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप ही नवीन गोष्ट नाही. ३० जुलै रोजीच जपानमध्ये ८ पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप झाला होता.
३ ऑगस्ट रोजी रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे ४ मीटर उंचीची त्सुनामी आली होती. ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले होते. कामचटका द्वीपकल्पावरील हा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा होता. ज्यामुळे पॅसिफिक प्रदेशात खूप चिंता निर्माण झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे