लातूरमध्ये ९०० थकबाकीदारांकडून ३ कोटींपेक्षा अधिक कर वसुली
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस थकबाकीदार मालमत्ताधारक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील लोकअदालात येथे पॅनल प्रमुख म्हणून पी एम शिंदे निवृत्त जिल
Q


लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस थकबाकीदार मालमत्ताधारक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील लोकअदालात येथे पॅनल प्रमुख म्हणून पी एम शिंदे निवृत्त जिल्हा न्यायाधीश व वकील प्रतिनिधी म्हणून एडवोकेट आशिष पोळ यांनी काम पाहिले यात ६००० थकबाकीदार मालमत्ता धारकाना नोटीस बजावण्यात आली होती त्यापैकी ९०० थकबाकीदार यांनी तडजोड करण्यात आली. मालमत्ता धारकाकडून एकाच दिवसात ३ कोटी चा कर संकलन करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे.

दि. १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन मनपा मुख्यालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस.जे.भारुका, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर वी.एन. गिरवलकर ⁠ व मनपा आयुक्त तथा प्रशासक मानसी(भा.प्र.से) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संपूर्ण कर वसुली करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी(भा.प्र.से) यांनी कर संकलन विभागास दिले होते. त्यादृष्टीने उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग वर्षाच्या सुरुवाती पासूनच टॅक्स वसुलीच्या दृष्टीने विविध उपक्रम/योजना राबवित आहे.

त्यानुसार मालमत्ता धारकाना विविध सूट/सवलती देण्यात आले होते. सोबतच थकबाकीदार मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत कराची रक्कम पाहता ही प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मधे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याकरिता ८० टक्के शास्ती माफी सुद्धा लागू करण्यात आली होती. तसेच सदर योजना एक दिवसासाठी संपूर्ण मालमत्ता धारकासाठी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये लोकअदालत सोबतच शहरातील इतर थकबाकीदार असे मिळून तब्बल ९०० हून अधिक थकबाकीदार मालमत्ता धारकाकडून एकाच दिवसात ३ कोटी चा कर संकलन करण्यात कर विभाग यशस्वी झाला आहे.

सदरील सुट ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लोकअदालत सह क्षेत्रीय कार्यालयात नागरिकानी टॅक्स भरणा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande