नाशिक जिल्हा कॅरम स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात
नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)। : नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन आणि डी. एस. एफ. स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने क्रीडा संघटक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू हेमंत पांडे यांच्या वाढदिवसा निमीत्त कोहिनूर इंटरनॅश
नाशिक जिल्हा कॅरम स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात.


नाशिक, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

: नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन आणि डी. एस. एफ. स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने क्रीडा संघटक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू हेमंत पांडे यांच्या वाढदिवसा निमीत्त कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल, आडगाव नाका, पंचवटी येथे ज्युनियर गटांच्या मुला - मुलींच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेमध्ये नाशिकच्या विवीध शाळा आणि संस्थांच्या एकूण २६५ खेळाडूंनी सहभाग घेवून उत्तम प्रतिसाद दिला.

या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध व्यावसायीक चंद्रशेखर सिंग यांच्या हस्ते प्रत्यक्ष कॅरम बोर्डवर खेळून करण्यात आले. यावेळी स्वतः हेमंत पांडे, कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मंजिरी अहिरे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, राजू शिंदे, अशोक कदम, दीपक निकम, स्पर्धा आयोजक भूषण भटाटे, भरत खत्री, उमेश सेंनभक्त, अभिषेक मोहिते, नकुल चावरे, प्रधान सर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना चंद्रशेखर सिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की खेळाडूंनी मेहनत करुन प्रगती करावी. त्यासाठी सर्व प्रकारची मदत आमच्याकडून केली जाईल असे सांगितले. हेमंत पांडे यांनी सांगितले की, आता खेळाडूंना आणि समाजाला वस्तुरुपी साधनांची आपेक्षा नाही तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची गरज आहे, आणि खेळातूनच ती मिळूं शकते. त्यासाठी जास्तीत जास्त तरुण मुलांनी मैदानात जावे असे आवाहन केले. सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे स्वागत आणि प्रस्ताविक आनंद खरे यांनी केले.

उदघाटनानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. १४ वर्षे आणि १७ वर्षे मुले आणि मुली अश्या दोन गटांमध्ये खेळविल्या जाणाऱ्या गटांमध्ये १४ वर्षे मुलींच्या गटात अपेक्षा सोनावणे, राधा खर्डे, फातिमा मणियार, ऋषी पठाण यांनी चांगला खेळ करत आपले सामने जिंकून चांगली सुरवात केली. १७ वर्षे मुलींच्या गटात तनुजा गाढवे, गौरी तेलगड, दिसली बलदवा यांनी आपले तीन सामने जिंकून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलांच्या १४ वर्षे गटांत राम जयस्वाल, सोहं पवार, आदेश वसावे आणि कार्तिक गोडबोले यांनीही सुंदर खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळविले.

१७ वर्षे मुलांच्या गटात श्रराज कुमावत, यश कानकाटे, प्रणव रामजाली, आर्यन उमाळे यांनी आपले प्रत्येकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उद्या सकाळी ९.३० वाजता उपांत्य आणि अंतिम सामने खेळविले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली.

आजचे निकाल :- १७ वर्षे मुले - १) श्रीराज कुमावत विजयी विरुद्ध अविजीत राय २-० २) रघुवीर रेवडे विजयी विरुद्ध राज मोरे २-०३) यश कानकाटे विजयी विरुद्ध सर्वज्ञ ढाकणे २-११७ वर्षे मुली - १)गौरी तेलंगड विजयी विरुद्ध श्रुती वाघ २-१ २) दिशाली बलदवा विजयी मेघा बिडे २-०३) दीपाली थोरात विजयी विरुद्ध वैष्णवी भिसे २-०४) तनुजा गाढवे विजयी विरुद्ध प्राची मनवर २-१ १४ वर्षे मुले - १) सोहं पवार विजयी विरुद्ध कार्तिक गोडबोले २-० २) आदेश वसावे विजयी विरुद्ध राम जयस्वाल २-०१४ वर्षे मुली - १) अपेक्षा सोनावणे विजयी विरुद्धरुही पठाण २-१ २) राधा खर्डे विजयी विरुद्ध फातिमा मणियार २-०

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande