लातूर - छ. शिवाजीराजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीला डॉ. आंबेडकर नॅशनल मेरिट अवॉर्ड
लातूर, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। उदगीर येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील कला शाखेची माजी विद्यार्थिनी कु. रुपाली सुरेंद्र बोरकर हिला भारत सरकार सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, नवी दिल्ली तर्फे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल
लातूर - छ. शिवाजीराजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीला डॉ. आंबेडकर नॅशनल मेरिट अवॉर्ड


लातूर, 13 सप्टेंबर, (हिं.स.)। उदगीर येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील कला शाखेची माजी विद्यार्थिनी कु. रुपाली सुरेंद्र बोरकर हिला भारत सरकार सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, नवी दिल्ली तर्फे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेरिट अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व केंद्रीय राज्यमंत्री . रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारात प्रशस्तीपत्र व रु. ६०,०००/- चा धनादेश असा गौरव समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, या वर्षी महाराष्ट्रातून फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये कु. रुपाली बोरकर यांची निवड झाली आहे.

फेब्रुवारी २०२२ च्या बोर्ड परीक्षेत तिने ९२.८३% गुण मिळवत महाराष्ट्रातून कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळवला होता. त्याच यशामुळे तिला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. रूपाली बोरकर ही पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून नुकतीच जून 2025 मध्ये विशेष प्रावीण्यासह पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे , सर्व कार्यकारणी पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे, पर्यवेक्षक प्रा. आर.पी. गिरी, महाविद्यालयाचे प्रबंधक बी.के. पाटील, अधीक्षक गुरनाळे व्ही.डी., आदींनी रूपालीचे अभिनंदन केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande