अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने गायत्री बालिकाश्रम येथे आरोग्य शिबिर संपन्न
अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने रविवारी गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह बसेरा कॉलनी मलकापूर येथे अधिवक्ता परिषदेच्या स्थापना दिवसा चे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अधिवक्त
P


अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)।

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने रविवारी गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह बसेरा कॉलनी मलकापूर येथे अधिवक्ता परिषदेच्या स्थापना दिवसा चे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अधिवक्ता परिषद अकोला जिल्हा या संघटनेच्या माध्यमातून गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह येथे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. श्रीश देशमुख यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये नवजात शिशु पासून तर 18 वर्षाच्या मुलींपर्यंत सर्वांचे आरोग्याची तपासणी करण्यात आली व त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले.

या लहान बाळांना विटामिन च्या टेबलेट्स, दूध पावडर व अन्य दैनंदिन उपयोगी औषध वितरित करण्यात आले. या शिबिराचा लाभ १०० बालकांनी घेतला.

या शिबिराच्या यशस्वी ते करिता देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीश देशमुख, डॉ वसीम, आशिष वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिवक्ता परिषद अकोला जिल्हा च्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख व समाज उपयोगी कार्यक्रम विशेषतः कायदा क्षेत्रात विविध विषयांवर तज्ञान मार्फत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते व लोक जागरण तसेच कायदा क्षेत्रातील वकिलांना तज्ञांच्यामार्फत वेळोवेळी सेमिनार व परिसंवाद घेऊन मार्गदर्शन करण्यात येते.

याप्रसंगी अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व मुख्य सरकारी वकील अँड राजेश्वर देशपांडे , प्रांत उपाध्यक्ष ॲड सत्यनारायण जोशी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande