अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
राज्यात सक्षम असलेल्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्णयानुसार मराठा समाज मागास नाही. त्यामुळे त्या समाजाला आरक्षण देणे योग्य नाही. राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गेझिटियर लागू करून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. याला रोकथाम करण्यासाठी लोकशाही मार्गाने उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने उद्या सोमवार 15 सप्टेंबरपासुन जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर या पाच प्रतिनिधिचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 प्रतिनिधी प्रतिनाधिक स्वरूपात आमरण उपोषण सुरु करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ओबीसी आरक्षणाचा समावेश केले आहे. 1 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने हैद्राबाद गॅझेट मराठा समाजाला लागू करण्याचा शासन निर्णय काढल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागला म्हणून भरत कराड या ओबीसी कार्यकर्त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. मात्र समाजाने असा मार्ग न निवडता लोकशाही मार्गाने लढा देण्यासाठी तयार असावे ह्यासाठी ओबीसी समाजाला धैर्य धरण्याचे आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आमरण उपोषण सुरु करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे