अकोला, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
जगामध्ये कुठही तीर्थ करायला जा त्यापेक्षा जास्त पुण्य आई-वडिलांची सेवा करून
मिळते आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मत अकोला पश्चिम चे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांनी कासंडी या सिनेमाच्या शुभारंभ प्रसंगी काढले. तसेच प्रा. स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांचे बॉडीगार्ड प्रकाश तायडे हे निर्माता व त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे अनिल मालगे यांच्या संकल्पनेने हा सिनेमा तयार होत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले अशा कार्यकर्त्यांमुळेच नेत्यांचे नाव अजरामर राहत असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.
कासंडी या सिनेमाचा शुभारंभ आमदार साजिद खान पठाण आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांची नाळ जोडलेला कासंडी हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतेच कासुंडीमुळेच शेतकऱ्यांच्या जनावरांचे विषारी साप व चोरांपासून रक्षण होते. बैलाच्या गळ्यातली घंटी मुळे
चोर सुद्धा वावरात यायला घाबरतात विषारी साप सुद्धा जवळ येत नाही शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने रक्षण करणारी कासंडी हे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे