'चीनवर ५० ते १००% कर लादला पाहिजे; ट्रम्प यांचे नाटोला पत्र
वॉशिंग्टन, 14 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानंतर आता चीनवर देखील 50 ते 100 टक्के टॅरिफ लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी शनिवारी (दि.१३) उत्तर अटलांटिक करार संघटनेला (नाटो) यासंदर्भात एक पत्र लिहिले. ट्रम्प यांनी रशिया
ट्रम्प


वॉशिंग्टन, 14 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानंतर आता चीनवर देखील 50 ते 100 टक्के टॅरिफ लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी शनिवारी (दि.१३) उत्तर अटलांटिक करार संघटनेला (नाटो) यासंदर्भात एक पत्र लिहिले. ट्रम्प यांनी रशियाच्या युद्ध यंत्रणेची कोंडी करण्यासाठी चीनवर 50-100% टॅरिफ लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी नाटो देशांना विनंती केली आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावं आणि चीनवर कठोर निर्बंध लावावेत, जेणेकरून युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबू शकेल. त्याचबरोबर रशियाची आर्थिक स्थितीही कमकुवत होईल.

ट्रम्प यांनी नाटो देशांना एक पत्र लिहिले होते, जे त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले. या पत्रात त्यांनी लिहिले, “मी रशियावर कडक निर्बंध लावण्यास तयार आहे, जेव्हा सर्व नाटो देश यावर सहमत होतील, स्वतः अशा पावले उचलतील आणि रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे थांबवतील.”

ते पुढे म्हणाले, “चीनवर 50% ते 100% पर्यंत टॅरिफ लावणे, जे रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर हटवले जाईल, हा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल. हा एक प्राणघातक… पण मूर्खतापूर्ण युद्ध थांबवण्यासाठी हे पाऊल अत्यंत उपयुक्त ठरेल.”

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, नाटोचा सदस्य देश तुर्की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारतानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर नाटो सदस्य जसे की हंगेरी आणि स्लोव्हाकिया देखील रशियन तेल खरेदी करत आहेत. ट्रम्प यांनी याआधीही मॉस्कोवर निर्बंध लावण्याची आणि रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर – जसे की चीन आणि भारत – यांच्यावर द्वितीयक निर्बंध लावण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर भारतावर 50% आणि चीनवर 30% टॅरिफ लावण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande