भारताने उद्ध्वस्त केलेल्या लष्कर-ए-तैयबा मुख्यालयाची पाकिस्तानकडून पुनर्बांधणी
इस्लामाबाद , 15 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ७ मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचे मुख्यालय ‘मरकज तैयबा’ पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. मात्र, आता त्या मुख्यालयाचा पुन्हा नव्याने पुनर्बांधणीच
भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केलेल्या लष्कर-ए-तैयबा मुख्यालयाची पाकिस्तानकडून पुनर्बांधणी सुरु


इस्लामाबाद , 15 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ७ मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचे मुख्यालय ‘मरकज तैयबा’ पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. मात्र, आता त्या मुख्यालयाचा पुन्हा नव्याने पुनर्बांधणीचा प्रयत्न सुरू झाला आहे.

माहितीनुसार, मुरीदके येथे असलेल्या मरकज तैयबा मुख्यालयाचे संपूर्णपणे पाडण्याचे काम १८ ऑगस्टपासून सुरू झाले. आता तिथे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. हे काम मरकज तैयबाचे संचालक मौलाना अबू जर आणि लश्कर-ए-तैयबाचे मुख्य प्रशिक्षक युनुस शाह बुखारी उर्फ ‘उस्ताद उल मुजाहिदीन’ यांच्या देखरेखीखाली केले जात आहे.

मुख्यालयाच्या जुन्या इमारती पाडण्यासाठी किमान पाच जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. २० ऑगस्टपर्यंत ‘उम्म-उल-क़ुरा’ या भागाचा काही हिस्सा पाडण्यात आला होता. त्याचदरम्यान, कमांडरच्या निवासस्थानाची इमारत ४ सप्टेंबर रोजी जमीनदोस्त करण्यात आली. लश्कर आणि पाकिस्तान सरकारची योजना आहे की पुढील वर्षी ५ फेब्रुवारीपूर्वी ही संपूर्ण इमारत पुन्हा उभारली जावी. लश्कर दरवर्षी ५ फेब्रुवारीला ‘काश्मीर एकजुटता दिवस’ साजरा करतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने या पुनर्बांधणीसाठी लश्करला सुरुवातीस ४ कोटी पाकिस्तानी रुपये दिले आहेत. लश्करच्या अंतर्गत अंदाजानुसार, हे मुख्यालय पूर्वीप्रमाणेच प्रशिक्षण आणि निवासाच्या सर्व सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी १५ कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

या खर्चासाठी पैसे गोळा करण्यासाठी लश्करने एक नवा मार्ग शोधला आहे. पूरग्रस्तांना मानवतावादी मदत देण्याच्या नावाखाली ते दान गोळा करत आहेत. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या मोहिमा राबवण्यात येत आहेत, ज्यामध्ये दहशतवादी स्वतःला ‘राहतकर्मी’ म्हणून दाखवत आहेत आणि मदतीच्या नावाखाली पैसे मागत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande