नाशिक , 14 सप्टेंबर (हिं.स.)। नाशिक येथे बनावट कॉल सेंटर च्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारी केंद्र सापडले असून या प्रकरणात दोन जणांना सीबीआयने शनिवारी उशिरा ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात आरोपींनी नाशिकमध्ये मेसर्स स्वगन बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर चालवल्याच्या आरोपावरून सीबीआयने ११ सप्टेंबर २०२५ रोजी चार खाजगी व्यक्ती आणि अज्ञात सरकारी सेवक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासात आरोपी व्यक्तींनी विमा एजंट, सरकारी अधिकाऱ्यांची बतावणी करून युके नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
या केंद्रांमध्ये सुमारे ६० लोक कार्यरत होते, जे व्हीओआयपी, बनावट क्रमांक आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून पीडितांना क्रेडिट, डेबिट कार्ड तपशील शेअर करण्यास आणि अस्तित्वात नसलेल्या विमा पॉलिसींसाठी पैसे देण्यास भाग पाडत होते. नाशिक, कल्याण येथील विविध ठिकाणी सीबीआयने छापे टाकले, ज्यामुळे पीडितांचा डेटा, बनावट विमा पॉलिसी स्क्रिप्ट, ८ मोबाईल फोन, ८ संगणक , प्रणाली तसेच पाच लाख रुपये रोख व इतर साहित्य मिळाले आहे या दोघांनाही सीबीआय ने अटक करून ठाणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार पर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV