पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)आयुष कोमकर खून प्रकरणी फरार असलेल्या आंदेकर टोळीतील माजी नगरसेविकेसह चौघांना गुजरात सीमेवर अटक केली आहे. अटक केलेल्यांत शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांचा समावेश आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा फरार असून, त्याच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. गुजरातमध्ये अटक केलेल्या चौघांची प्रवासी कोठडी मिळवली असून, त्यांना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतील टोळीयुद्धातून आयुष कोमकर याचा खून झाला होता. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत बंडूअण्णा आंदेकर (७०), त्यांचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), विवाहित मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसुफ पठाण (२५) यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) सुजल राहुलू मेरगु (२०, भवानी पेठ) यांना आधीच अटक झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु