अमरावती, 15 सप्टेंबर (हिं.स.)
येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त रामदास सिद्धभुट्टी यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून दोन ते अडीच लाख रुपये रोख लंपास केली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध रविवारी (दि. १४) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.रामदास सिद्धभट्टी यांचा शहरातील गणेडीवाल लेआऊटमधील. निर्मल कलश अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. सिद्धभट्टीमागील एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर असून या काळात ते त्यांच्या मुलाकडे पुण्याला गेले होते. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. १३ सप्टेंबरला सिद्धभट्टी यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून तुमच्या फ्लॅटचा कडीकोंडा तुटलेला असून घरात चोरी झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सिद्धभट्टी अमरावतीसाठी निघाले. रविवारी त्यांनी फ्लॅटमधील लोखंडी आलमारीत पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले दोन ते अडीच लाख स्पयांची रोकड दिसली नाही. तसेच तीन हजार रुपये चिल्लर असा ऐकज चोरट्यांनी लंपास केला आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी