सोलापूर - नर्तिकेच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ
सोलापूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। प्रियकराला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पूजा देविदास गायकवाड (वय 21, रा. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) या नर्तकी महिलेच्या पोलिस कोठडीत आज आणखी दोन दि
सोलापूर - नर्तिकेच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ


सोलापूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।

प्रियकराला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पूजा देविदास गायकवाड (वय 21, रा. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) या नर्तकी महिलेच्या पोलिस कोठडीत आज आणखी दोन दिवसांची सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

‘माझ्या नावावर बंगाल कर नाहीतर भावाच्या नावावर पाच एकर जमीन कर’ अन्यथा तुझ्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील गोविंद जगन्नाथ बरगे (वय 34, रा. लुखामसला, ता. गेवराई, जि. बीड) या माजी उपसरपंचाने बार्शी तालुक्यातील सासुरे येथे लोक कला केंद्रातील प्रेयसीच्या आईच्या घराजवळ आत्महत्या केली होती. नर्तकी गायकवाड हिला अटक करून न्यायालयात उभे केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande